काँग्रेसच्या ओ.बी.सी.विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांच्या हस्ते महादेव चव्हाण यांना नियुक्ती पत्र प्रदान

चिपळूण (प्रतिनिधी) : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांचे मान्यतेने ओ.बी.सी.विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजयसिंह यादव यांचे आदेशाने आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांचे शिफारशीने काँग्रेसच्या ओ.बी.सी.विभागाचे प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी साहेब यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ आणि नाभिक समाजाचे नेते तसेच श्री संतसेना नाभिक व्यावसायिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेचे अध्यक्ष महादेव चव्हाण यांची रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
तदप्रसंगी प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी यांच्या हस्ते महादेव चव्हाण यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष अशोक जाधव, सोबत सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष हनीफ खलिपे, सेवादल विभागाचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम पवार, जिल्हा काँग्रेस सेक्रेटरी राजेंद्र भुरण, ओ.बी.सी.विभागाचे जिल्हा सेक्रेटरी संदिप बांद्रे, ओ.बी.सी.चे चिपळूण तालुका अध्यक्ष केशव लांबे, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष यशवंत किल्लेदार, राजकुमार लांबे, सातारा जिल्हा अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा अध्यक्ष संजय तडके, संपत पवार, रमेश नांगरे आदी उपस्थित होते.