सिव्हील हॉस्पीटलमध्ये दर बुधवार व शुक्रवारी विशेष शिबिरे
रत्नागिरी, : ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे आरोग्य विभागाकडील जुन्या ऑफलाईन हस्तलिखित किंवा प्रिंटेड दिव्यांग प्रमाणपत्रे आहेत, त्यांनी संगणक प्रणालीद्वारे Unique Disability ID (UDID) ऑनलाईन काढणे बंधनकारक आहे. यासाठी माहे जानेवारी 2026 या महिन्यात रत्नागिरी तालुक्यात दर बुधवार व शुक्रवार या दिवशी सकाळी 9.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (सिव्हील हॉस्पीटल) येथे शिबिर आयोजित करण्यात आल्याचे तहसिलदार राजाराम म्हात्रे यांनी कळविले आहे.*
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दि. 15 सप्टेंबर 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार दिव्यांग लाभार्थ्यांच्या मासिक अनुदानात वाढ करून ते रुपये 2,500/- इतके करण्यात आले आहे. या वाढीव अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी शासनाच्या DBT पोर्टलवर लाभार्थ्याच्या नावासमोर Unique Disability ID (UDID) क्रमांक अपलोड असणे आवश्यक आहे.
ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ व इंदिरा गांधी योजनेचे अर्थसहाय्य मिळते. परंतु, अद्यापही Unique Disability ID (UDID CARD) नाही अशा लाभार्थ्यांनी शिबीराच्या तारखेपूर्वी आवश्यक त्या कागदपत्रासह Unique Disability ID (UDID CARD) काढण्याकरिता जवळच्या महा-ई-सेवा केंद्र अथवा आपले सरकार केंद्र अथवा प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यालयातील संगणक ऑपरेटर यांच्यामार्फत https://swavlambancard.gov.in या वेबलिंक वर आवश्यक त्या माहीतीसह ऑनलाईन अर्ज दिव्यांग लाभार्थ्यांचे नातेवाईक/हितचिंतक यांच्यामार्फत आपल्या तालुक्यातील शिबीराचे तारीखे पूर्वी करावा जेणेकरुन शिबीराच्या दिवशी ऑनलाईन अर्ज करण्याचा वेळ वाचेल.
ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ व इंदिरा गांधी योजनेचे अर्थसहाय्य मिळते पंरतु त्यांचेकडे अद्यापही Unique Disability ID (UDID CARD) नाही अशा लाभार्थ्यांनी वरील शिबीरात सहभागी होऊन स्वत:चे UDID CARD काढून घ्यावे व शासनास सहकार्य करावे. ज्या दिव्यांग लाभार्थाकडे UDID CARD आहे परंतू Aadhar E-kyc केलेली नाही अशा व्यक्तीनी महा- ई- सेवा केंद्र किंवा जिल्हा दिव्यांग पुर्नवसन केंद्र यांचेशी संपर्क साधून Aadhar E-kyc करुन घ्यावी व त्याची प्रत तहसील कार्यालयाच्या संजय गांधी योजना शाखेत जमा करावी.












