मालवण तालुक्यातील 6 जिल्हा परिषद तसेच 12 पंचायत समिती जागांसाठी निवडणूक
मालवण | प्रतिनिधी : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया गुरुवारी मालवण तहसील कार्यालय येथे निवडणूक अधिकारी तसेच उमेदवार व प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पार पडली. यात पेंडूर पंचायत समिती आरक्षित जागेसाठी अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या अपक्ष महिला उमेदवार यांचा उमेदवारी अर्ज जात वैधता प्रमाणपत्र अथवा पावती दाखल नसल्याने अवैध ठरविण्यात आला.
छाननी अंती मालवण तालुक्यातील 6 जिल्हा परिषद जागांसाठी 28 तसेच 12 पंचायत समिती जागांसाठी 52 असे एकूण 80 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. याबाबत माहिती मालवण निवडणूक निर्णय विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. 27 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत पर्यत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर अंतिम उमेदवार निश्चिती होणार आहे. त्याच दिवशी दुपारी 3:30 वाजता अपक्ष उमेदवार यांना उमेदवारी चिन्ह दिले जाणार आहे.
निवडणुक 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे तर 7 फेब्रुवारी रोजी मालवण शासकीय तंत्रनिकेतन येथे मतमोजणी होणार आहे. अशी माहिती देण्यात आली.










