मसुरे | झुंजार पेडणेकर :११६ वर्षाची परंपरा असणाऱ्या वडाचापाट पाटकरवाडी बंधु मंडळातर्फे २६ जानेवारी २०२६ रोजी
वार्षिक जत्रोत्सव श्री शांतादुर्गा देवी सभामंडप, वडाचापाट येथे होणार आहे. रात्रौ ठिक ८ वा.स्वयंभू आई श्री शांतादूर्गा देवीची विधिवत पूजा अर्चा,
रात्रौ ठिक ८ वा. १५ मि.
ओटी भरणे आणि नवस फेडणे,
रात्रौ ठिक ११ वा.
वालावलकर दशावतार नाटयमंडळ ओसरगाव यांचा दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे. उपस्थितीचे आवाहन पाटकरवाडी बंधूमंडळ आणि आप्तेष्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे.









