चिपळूण :
राज्याचे राजकारण हादरवून टाकणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना आज घडली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात आकस्मिक निधन झाले. या भीषण घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज चिपळूण येथे होणारी जिल्हा परिषद प्रचार सभा तातडीने रद्द करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. त्यांचे विमान बारामती विमानतळावर उतरत असताना तांत्रिक बिघाडामुळे धावपट्टीच्या काही अंतरावर कोसळले. जमिनीवर आदळताच विमानाने भीषण पेट घेतला. या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील पायलट आणि इतर सुरक्षा रक्षकांचा जागीच मृत्यू झाला.
आज चिपळूणमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच मुख्यमंत्र्यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत.











