Amazon मध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात टाळेबंदीची चाहूल; ‘Project Dawn’ ईमेलमुळे कर्मचाऱ्यांमध्ये घबराट

पुणे/वॉशिंग्टन: ॲमेझॉन कॉर्पोरेट लेऑफच्या दुसऱ्या फेरीची तयारी करत असल्याच्या पार्श्वभूमीवर 27 जानेवारी रोजी कर्मचाऱ्यांना मिळालेल्या ‘Send Project Dawn Email’ या कॅलेंडर आमंत्रणामुळे मोठा गोंधळ उडाला. हे आमंत्रण कंपनीतील कार्यक्षमता वाढवण्याच्या अंतर्गत उपक्रमाशी संबंधित असल्याचे सांगितले जात असले, तरी त्यातून नोकरी कपातीचे संकेत मिळत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे.

AWS सोल्यूशन्सच्या वरिष्ठ उपाध्यक्ष कॉलिन ऑब्रे यांच्या वतीने एका सहाय्यकाने हा ईमेल पाठवला होता. 28 जानेवारी रोजी सकाळी 5 वाजता (पॅसिफिक वेळ) कार्यक्रम नियोजित असल्याचे नमूद होते; मात्र तो कार्यक्रम लगेचच रद्द करण्यात आला. तरीही या आकस्मिक आमंत्रणामुळे कंपनीतील चर्चांना वेग आला.

‘Project Dawn’ म्हणजे नेमकं काय?

अहवालानुसार, ‘Project Dawn’ हा ॲमेझॉनच्या ऑपरेशन्स सुव्यवस्थित करण्याच्या चालू प्रयत्नांचा भाग आहे. ऑब्रे यांच्या अंतर्गत नोटमध्ये,

स्लॅकवर चर्चा, संभ्रम कायम

हा ईमेल 36,000 हून अधिक कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत स्लॅक चॅनेलवर वेगाने पसरला. “माझ्यावर परिणाम झाला आहे की चुकून सर्वांनाच पाठवले आहे?” असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. काहींना वाटले की आमंत्रण मिळालेल्या कर्मचाऱ्यांना कदाचित कपातीपासून वगळले जाईल; मात्र अनिश्चितता अद्याप कायम आहे.

आणखी 14,000 पदांवर गंडांतर?

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ॲमेझॉन येत्या आठवड्यांत सुमारे 14,000 कॉर्पोरेट पदे कमी करण्याच्या तयारीत आहे. ऑक्टोबर 2025 नंतरची ही दुसरी मोठी टाळेबंदी ठरणार असून, एकूण नियोजित कपात सुमारे 30,000 भूमिकांपर्यंत पोहोचू शकते—कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठी.

या फेरीत AWS, किरकोळ ऑपरेशन्स, प्राइम व्हिडिओ आणि मानव संसाधन (PXT) विभागातील कर्मचारी प्रभावित होण्याची शक्यता असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.