मंडणगड नगरपंचायतीच्या विविध विकासकामांचा उद्या भूमिपूजन सोहळा; खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते शुभारंभ

मंडणगड प्रतिनिधी : मंडणगड नगरपंचायतीच्या माध्यमातून शहराच्या पायाभूत सुविधा आणि नागरी विकासाला चालना देण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा गुरुवार, १२ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते हा सोहळा पार पडणार आहे. होणाऱ्या कामांमध्ये केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० योजनेअंतर्गत मंडणगड नगरपंचायतीची पाणीपुरवठा योजना, कृष्णानगर येथे नमो उद्यान विकसित करणे तसेच मंडणगड एस.टी. बसस्थानक परिसरात सार्वजनिक शौचालय बांधणे या तीन महत्त्वपूर्ण कामांचा समावेश आहे. या कार्यक्रमास राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मंत्री उदय सामंत जिल्हा परिषद रत्नागिरीच्या अध्यक्षा अस्मिता अनंत केंद्रे खासदार नारायण राणे, खासदार ज्ञानेश्वर म्हात्रे, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, प्रमोद जठार, शेखर निकम, भास्कर जाधव, किरण सामंत आदी मान्यवरांची विशेष निमंत्रीत आहेत. तसेच जिल्हाधिकारी मनुज जिंदल, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि मुख्याधिकारी वैदेही रानडे यांचीही उपस्थिती अपेक्षित आहे. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता मंडणगड येथे आयोजित करण्यात आलेल्या या भूमिपूजन सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे, बांधकाम सभापती राजश्री सापटे, पाणीपुरवठा सभापती मनीषा हातमकर, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, नगराध्यक्ष सोनल बेर्डे, महिला बालकल्याण सभापती समृद्धी शिगवण, मागासवर्गीय कल्याण समिती सभापती रेश्मा मर्चंडे तसेच सर्व नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी यांनी केले आहे. नागरीकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन नगरपंचायत व आयोजकांचेवतीने करण्यात आले आहे