ब्रेकिंग न्यूज: कर्नाटकहून येणारा सिमेंट टँकर हातखंब्यात उलटला, घटनास्थळी पोलीस दाखल!

रत्नागिरी: कर्नाटक राज्यातून रत्नागिरीच्या दिशेने येणारा सिमेंटने भरलेला एक टँकर आज हातखंबा घाटात उलटल्याने खळबळ उडाली. घाटातील एका वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने हा टँकर रस्त्यावरच कलंडला. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, गेल्या तासाभरापासून या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सध्या महामार्गावरील वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू आहे.

​घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. रस्त्यावर कलंडलेला टँकर बाजूला करण्यासाठी क्रेन पाचारण करण्यात आली असून, वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.