मसुरे | झुंजार पेडणेकर : महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचलनालय तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी सिंधुदुर्ग ओरोस यांच्या परिपत्रकाप्रमाणे ते १४ ते २८जानेवारी २०२६ या कालावधीत “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” साजरा करण्याबाबत सर्व सार्वजनिक ग्रंथालयांना निर्देशित करण्यात आलेले होते. त्यानुसार कांदळगाव येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने जि.प. प्राथमिक शाळा कांदळगाव नंबर १, जि.प. प्राथमिक शाळा कांदळगाव, परबवाडा नंबर २ आणि ओझर विद्यामंदिर कांदळगाव, तालुका मालवण ह्या माध्यमिक शाळेमध्ये विविध प्रकारच्या शालेय स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. आपल्या मातृभाषेचा समृद्ध वारसा पुढील पिढीने जतन करून ठेवावा, किंबहुना तो वृद्धिंगत करावा, मराठी भाषेची अधिकाधिक गोडी लागावी, मराठी भाषेचा विकास व्हावा व तिचे संवर्धन व्हावे आणि अधिकाधिक मराठी साहित्य निर्मिती व्हावी या उदात्त हेतूने राबविलेल्या या उपक्रमास मुलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा निकाल खालील प्रमाणे-
इयत्ता पहिली- मराठी शब्दांचे लेखन करणे- प्रथम कौस्तुभ राजन मेस्त्री, द्वितीय- अभंग प्रवीण परुळेकर, तृतीय- तनुष गणेश नातू,
इयत्ता दुसरी- मराठी शब्दांचे लेखन करणे, प्रथम- हृदया नारायण मेस्त्री द्वितीय- ग्रीतीक स्वप्निल साटम, तृतीय- यशश्री गोविंद परब, इयत्ता तिसरी-मराठी वाक्य लेखन करणे,प्रथम- शिवम विराज तळाशीलकर, द्वितीय- जागृती अजित कांदळगावकर, तृतीय- जीविका रुपेश मेस्त्री, इयत्ता- चौथी-मराठी म्हणींचे लेखन करणे, प्रथम- वैभवी राकेश कदम, द्वितीय- मोहित यशवंत आयकर, तृतीय- कल्प नंदकिशोर कांदळकर, इयत्ता- पाचवी- मराठी म्हणींचे लेखन करणे, प्रथम- रुचीरा संजय कुंभार , द्वितीय- रुही रामचंद्र गुरव, तृतीय-सावनी मंगेश कदम, इयत्ता- सहावी- मराठी वाक्प्रचार व म्हणींचे लेखन करणे, प्रथम- स्मृती उदय परब, द्वितीय- योगेश यशवंत आयकर, तृतीय-हर्षिका राकेश कदम, इयत्ता-सातवी- मराठी वाक्प्रचार व म्हणींचे लेखन करणे, प्रथम-चिन्मयी राजेंद्र पारकर, द्वितीय- कृष्णा राजन मेस्त्री, तृतीय-चैतन्य प्रकाश कांबळी, इयत्ता-आठवी- हस्ताक्षर स्पर्धा, प्रथम- प्रांजली संजय कुंभार, द्वितीय- स्वरा चंद्रशेखर कांबळी, तृतीय-ईश्वरी विजय सांडव, इयत्ता- नववी-हस्ताक्षर स्पर्धा, प्रथम-तृप्ती दीपक परुळेकर,द्वितीय- भक्ती जयराम तेली, तृतीय-विभागून हर्षाली प्रकाश लाड, रिद्धी राकेश कदम.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष श्री उदय परब,कार्यवाह श्री. प्रवीण पारकर, हिशोब तपासणीस श्री प्रवीण लवू परब सहकार्यवाह श्री.आनंद उमशेठ आयकर, खजिनदार श्री. गजानन शांताराम सुर्वे, सदस्य श्री.मंगेश आनंद कदम, श्री. विजय भालचंद्र नातू, ग्रंथपाल सौ. साक्षी राजन मेस्त्री, कर्मचारी श्री. महेश साळकर, जि. प. प्राथमिक शाळा, कांदळगाव नंबर १ च्या मुख्याध्यापिका श्रीमती संध्या मेथर, शिक्षिका सौ. कर्णे, परबवाडा प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रभूगावकर, ओझर विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री. डी. डी. जाधव, साहाय्यक शिक्षक श्री. ए.ए. शेर्लेकर, श्री. पी.के राणे, श्रीमती सुनयना पवार, लिपिक श्री.रविराज जाधव, श्री. प्रकाश खोडके, श्री मधुसूदन परुळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.











