शशिकांत परूळेकर

कणकवली : मालवण तालुक्यातील रामगड येथील व्यापारी तसेच वृत्तपत्र विक्रेते आणि पत्रकार म्हणून परिचित असलेले शशिकांत न.परूळेकर ( वय ८४ वर्ष )यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. शशिकांत परूळेकर यांनी अनेक वर्षे विविध वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम करताना ग्रामीण भागातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले होते. मालवण तालुका खादी ग्रामोद्योग संचालक संजय परूळेकर यांचे ते वडील व तर मालवण पंचायत समिती माजी उपसभापती
सतिश (राजु) परूळेकर यांचे ते चुलत भाऊ होत.