मसुरे | झुंजार पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी आंगणेवाडी येथे श्री देवी भराडी मातेचे दर्शन घेऊन 9 फेब्रुवारी 2026 रोजी साजऱ्या होणाऱ्या जत्रेसंदर्भातील नियोजनाची माहिती घेतली.यावेळी त्यांनी मंदिर परिसर तसेच इतर महत्वाच्या ठिकाणाची पाहणी केली. यावेळी त्यांचा आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांच्यावतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मालवण पोलीस निरीक्षक मारुती जगताप, सुरज रेडकर, मसुरे बिट अंमलदार संजय हुंबे, बाबू आंगणे भास्कर आंगणे, बाळा आंगणे, पोलीस पाटील पंकज आंगणे, सतीश आंगणे, रुपेश आंगणे आदी उपस्थित होते.












