ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे परिसरात सकाळीच भल्या मोठया गव्यांच दर्शन झालं असून. पेरणे येथे मैदान परिसरात हा गवा मुक्त संचार करताना आढळून आला.या परिसरात गव्यांचे दर्शन वारंवार घडत आहे मात्र दिवसा धवळ्या राजरोस पणे वावरणाऱ्या या वन्य प्राण्यांमुळे ग्रामस्थामध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात गवे तसेच अन्य जंगली जनावरे शेतीचे मोठे नुकसान करतात.त्यामुळे या परिसरातील शेतकरी आदीच हवालदिल असून आता तर हे गवे दिवसाचे भरवस्ती शेजारून फिरत असल्याने लोकांमध्ये अजून भीतीचे वातावरण पसरले आहे.











