मनोजकुमार नार्वेकर सेवानिवृत्ती प्रसंगी सत्कार

गौरव पोंक्षे माखजन
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या ॲड पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व माखजन इंग्लिश स्कूल चे माजी मुख्याध्यापक मनोजकुमार विश्वनाथ नार्वेकर सेवानिवृत्त झाले.याप्रसंगी मनोजकुमार नार्वेकर यांचा शाळ श्रीफळ बुके देऊन सन्मान करण्यात आला.
मनोजकुमार नार्वेकर ह्यांनी वाणिज्य शाखेत अध्यापनाचे काम केले.सुमारे ३० वर्षे त्यांना एकूण अध्यापनाचा अनुभव होता.त्यांनी आपल्या अध्यापनातून वेगळी ओळख निर्माण केली होती.प्रभावी अध्यापनामुळे ते विद्यार्थी प्रिय झाले आहेत.शिस्तप्रिय आणि कामातील काटेकोर पणा ह्यामुळे शिक्षक वर्गात त्यांचे कडे आदराने पाहिले जात होते.
त्यांचा संस्था.शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सचिव दीपक पोंक्षे,सहसचिव दीपक शिगवण,शाळा समिती अध्यक्ष मनोज शिंदे,संचालक संजय सहस्त्रबुद्धे माजी संचालक सतीश साठे,मुख्याध्यापक महादेव परब,इंग्लिश मिडीयम च्या मुख्याध्यापिका धनश्री राजेसावंत,पर्यवेक्षक अंबादास घाडगे,स्वप्नील बापट व शिक्षक आदी उपस्थित होते.