लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील शिपोशी येथे काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला असून, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात राजकीय सभा आणि प्रचाराचा धुळा उडत आहे. या पार्श्वभूमीवर आज शिपोशी येथे पार पडलेल्या कार्यक्रमाप्रसंगी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या प्रवेशामुळे परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे असून, शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम झाली आहे.
तालुक्यातील चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार सध्या तालुक्यात जोरदारपणे सुरू आहे. शिपोशी येथे झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्व काँग्रेस आणि वंचितच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांचे आमदार किरण सामंत यांनी स्वागत केले. शिवसेनेच्या माध्यमातून विकासाची दिशा अधिक वेगाने पुढे नेण्याचा विश्वास व्यक्त केला.स्थानिक विकासकामे, जनतेशी थेट संपर्क आणि नेतृत्वावर असलेला विश्वास यामुळे हा प्रवेश झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
यावेळी स्कूल कमिटीचे चेअरमन श्रीकृष्ण जाधव, गावकर संभाजी बाईंग,माजी सरपंच हरेश जाधव, गणेश बाईग,मिलिंद कांबळे ,मारुती खामकर, महेंद्र खुर्द, प्रकाश सुर्वे शरद सुतार, रमेश कांबळे, प्रकाश कांबळे, शंकर कांबळे यांचे सहित अनेक काँग्रेस आणि वंचित च्या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.













