परुळे पं.स. महायुतीचे अधिकृत उमेदवार निलेश सामंत यांच्या प्रचाराचा शुभारंभ

परुळे : प्रतिनिधी
परुळे पंचायत समिती साठी महायुतीचे अधिकृत उमेदवार निलेश सामंत यांच्या घर तू घर प्रचाराचा शुभारंभ श्री देवी वराठी मंदिर परुळेबाजार व श्री देव वेतोबा मंदिर येथे करण्यात आला. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महायुतीचे परुळे पंचायत समितीचे उमेदवार निलेश सामंत यांनी आपल्या प्रचाराचा दणक्यात शुभारंभ केला आहे. एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणुन या मतदार संघात त्यांची ओळख आहे. यापूर्वी ते जिल्हा परिषद शिक्षण सभापती तसेच पंचायत समिती सभापती अस त्यांचा राजकिय प्रवास आहे. ते पुन्हा एकदा पक्षश्रेष्ठींनी या मतदार संघातून निवडणूक लढवावी अशी संधी दिली आहे. याचाच भाग म्हणुन कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडला आहे. यावेळी स्वतः निलेश सामंत, तसे कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, परुळे बाजार सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दूधवडकर, माजी सरपंच प्रदीप प्रभू, प्राजक्ता चिपकर, व्हाईस चेअरमन प्रसाद पाटकर यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.