२५ उमेदवार बिनविरोध झाल्यामुळे ६० मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया नाही! 

३८४४९ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. 

 प्रचाराची मुदत उद्या साय. १०. वा. संपणार

सिंधुनगरी | बाळ खडपकर :सिंधुदुर्ग जिल्ह्यात जि. प. चे ८ व प.स. चे १७ असे २५ उमेदवार बिनविरोध झाल्यामुळे ६० मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रिया होणार नाही व त्यामुळेच ३८४४९ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. आता जिल्ह्यातील एकूण ८७० मतदान केंद्रापैकी ८१० मतदान केंद्रावर मतदान होईल. जिल्ह्यातील एकूण ५ लाख ९९ हजार ५६४ एकूण मतदारांपैकी ५ लाख ६१ हजार १०५ मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. जिल्हा परिषदेसाठी ११५ उमेदवार व पंचायत समिती साठी २४४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणूक प्रक्रिया, मतमोजणी, कर्मचारी अधिकारी पोलीस बंदोबस्त पूर्वतयारी पूर्ण झाली आहे व प्रशासन सज्ज झाले आहे अशी माहिती सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी सौ तृप्ती धोडमिसे व जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मा. तृप्ती धोडिमसे यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंदा चिलवंत आदी अधिकारी उपस्थित होते.

निवडणूक कार्यक्रमानुसार ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान, तर ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. मतमोजणीची ठिकाणेही निश्चित झाली आहेत. मतदारांसाठी आदर्श मतदान केंद्र, सखी मतदान केंद्र, सेल्फी पॉइंट तसेच SVEEP अंतर्गत जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.निवडणूक प्रचाराची मुदत गुरुवारी ५ फेब्रुवारी रोजी संध्या. १० वाजता संपत आहे. दिली.

जिल्हा परिषदेसाठी प्रत्यक्षात निवडणूक लढवित असलेल्या उमेदवारांची एकूण संख्या 115 तर पंचायत समितीसाठी 244 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले. तर निवडणूक प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आचारसंहिता कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा भंग होणार नाही यासाठी गस्त वाढविणे, प्रतिबंधात्मक कारवाई, तसेच गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी दिली.

 

जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या की, जिल्ह्यात प्रत्यक्ष मतदार 5 लाख 61 हजार 105 एवढे आहेत. यामध्ये 2 लाख 82 हजार 588 स्त्री मतदार तर 2 लाख 78 हजार 516 पुरूष मतदार आहेत. मतदान आणि मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Box

एकच नाव अनेक व्यक्ती: दुबार मतदार वाढले

 

एकाच नावाच्या अनेक व्यक्ती असल्यामुळे दुबार मतदार मोठ्या संख्येने दिसत आहेत. दुबार मतदारांचा आकडा १०८४७ निश्चित झाला आहे. मात्र यातील ७२९ दुबार मतदारांचा शोध घेण्यास प्रशासनाला यश आले आहे. १०७४ दुबार मतदारांशी संपर्क होऊ शकलेला नाही. यातील ३३६ मतदार मयत आहेत. हे मतदार दुबार मतदार वगळता एकाच नावाच्या अनेक व्यक्ती असल्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीदरम्यान या मतदारांचा नमुना फॉर्म भरून घेऊन एकाच ठिकाणी मतदानाचा अधिकार या मतदारांना दिला जाणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली.

 

निवडणूकीची वैशिष्‍टये

मतदाराची ओळख पटविण्‍यासाठी पक्‍कया न मिटणा-या शाईचा वापर केला जाणार. आचारसंहिता कक्ष व तक्रार निवारण कक्ष २४ तास कार्यान्वित mahasecvotelist.in अॅपचा मतदारांची नावे शोधणेसाठी वापर करता येईल. गुगल प्‍ले स्‍टोअर वरुन matadhikar अॅप डाऊनलोड करुन मतदारांची माहिती प्राप्‍त करता येणार, मतदाना सुरु होण्‍याआधी २४ तास प्रचाराची मुदत संपणार. जिल्‍हास्‍तरीय माध्‍यम प्रमाणन समिती गठीत तसेच निवडणूक सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. खर्च नियंत्रण समिती गठीत, कॅश रिलीज कमिटी गठीत झाली आहे. एकूण मतदान केंद्रांची संख्‍या ८७० पैकी ८१० मतदान केंद्रावर मतदान होणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

क्षेत्रीय दंडाधिकारी – 134 केंद्राध्‍यक्ष – 891

मतदान अधिकारी -०१- 891,मतदान अधिकारी – 891 मतदान अधिकारी – 891, शिपाई – ८७२, व्‍यवस्थापक – ८७२ असे एकूण – 5440 अधिकारी कर्मचारी यांचे मनुष्यबळ या निवडणुकीसाठी काम करणार आहे. याव्‍यतिरीक्‍त ०८ निवडणूक निर्णय अधिकारी, १६ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्‍ती , ०२ निवडणूक निरीक्षक कार्यरत आहेत.

 

9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणी आराखडा पूर्ण झाला आहे. मतमोजणी ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. मालवण व सावंतवाडी हे दोन तालुके वगळता अन्य सर्व तालुक्यांची मतमोजणी त्या त्या तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणी होणार आहे. तर मालवणची मतमोजणी कुंभार माठ येथील तंत्रनिकेतन कॉलेज व सावंतवाडी येथील मत मोजणी बॅडमिंटन हॉल जिमखाना येथे होणार आहे.सकाळी १०.०० वाजलेपासून होणार मतमोजणी असेही जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्पष्ट केले.