भाजप नेते प्रशांत यादव यांनी प्रवेशकर्त्यांचे केले स्वागत
चिपळूण (प्रतिनिधी) :– तालुक्यातील नांदिवसे येथील कार्यकर्त्यांनी भाजप नेते प्रशांत यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश केला. यावेळी यादव यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. तर भाजप पक्ष आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही दिली. तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी सर्वांनी सामूहिक योगदान द्यावे, असे आवाहन प्रशांत यादव यांनी यावेळी केले.
याप्रसंगी वामनराव शिंदे, हेमंत शिंदे, अमोल साळुंखे, सुशील शिंदे, विनोद शिंदे, संजय कदम, राजेंद्र सुतार, संदीप पाडेकर, काशिनाथ काकुर्डे, नागेश शिगवण, गंगाराम मोरे आणि दिलीप कदम यांनी भाजपात प्रवेश केला.
यावेळी ते पुढे म्हणाले की, भाजपा हा धोरणात्मक ‘व्हिजन’ असणारा पक्ष आहे. त्यामुळे पक्षात सक्षम नेतृत्वाला पाठबळ देऊन मोठे केले जाते. केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांमध्ये सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याचे काम झालेले आहे, असे नमूद केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रवेशकर्ते व स्थानिक नागरिक उपस्थित होते.












