रत्नागिरी: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली असून, पहिल्या दोन तासांत चिपळूण, दापोली आणि गुहागर तालुक्यांत मतदारांचा उत्साह पाहायला मिळाला. सकाळी ९:३० वाजेपर्यंतची अधिकृत आकडेवारी समोर आली असून, यामध्ये सरासरी ११ ते १२ टक्के मतदान झाले आहे.
तालुकानिहाय मतदानाची आकडेवारी खालीलप्रमाणे:
१. चिपळूण:
चिपळूणमध्ये सकाळी ९:३० वाजेपर्यंत ११.३२% मतदान झाले आहे. येथे एकूण १,८३,६७३ मतदारांपैकी २०,७९१ मतदारांनी आपला हक्क बजावला. यामध्ये १०,३५० पुरुष आणि १०,४४१ महिला मतदारांचा समावेश आहे.
२. दापोली:
दापोली तालुक्यात सकाळी ९:३० वाजेपर्यंत ११.१६% मतदानाची नोंद झाली आहे. एकूण १,४०,५५८ मतदारांपैकी १५,६८७ जणांनी मतदान केले. यात ८,८३७ पुरुष आणि ६,८५० महिलांनी मतदानात सहभाग घेतला.
३. गुहागर:
गुहागरमध्ये मतदानाचा वेग सुरुवातीला चांगला असून सकाळी ९:३० पर्यंत येथे १२.६२% मतदान झाले आहे. एकूण ९६,८३२ मतदारांपैकी १२,२१८ मतदारांनी मतदान केले, ज्यामध्ये ६,५०१ पुरुष आणि ५,७१७ महिला मतदारांचा समावेश आहे.
सकाळच्या सत्रात महिला आणि पुरुष दोन्ही वर्गातील मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडताना दिसत आहेत. मतदानाची प्रक्रिया शांततेत सुरू असून दुपारपर्यंत हा टक्का वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.












