वेंगुर्ले तालुक्यात पहिल्या दोत तासांत ९.९८ टक्के मतदान..

लग्नाला जाण्यापूर्वी नववधूने बजाविला मतदानाचा हक्क..

वेंगुर्ले : दाजी नाईक

जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज शनिवार सकाळपासून सर्वच मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरू झाली असून सकाळी ७.३०ते ९.३० पर्यंत वेंगुर्ला तालुक्यात ९.९८ टक्के मतदान झाले.

वेंगुर्ला तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ५ आणि पंचायत समितीच्या १० जागांसाठी आज मतदान घेण्यात येत आहे. यासाठी वेंगुर्ला तालुक्यामध्ये ८७ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. दरम्यान, आज शनिवारी सकाळी ७.३० वाजल्यापासून तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदानाला प्रारंभ झाला. पहिल्या दोन तासांत जि.प. आणि पं.स.साठी ३ हजार ६०३ पुरूषांनी तर २ हजार २६१ स्त्रीयांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण ९.९८ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणुक विभागाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी वेंगुर्ले तालुक्यातील परुळे येथे नववधूने आपल्या मतदानाचा हक्क बजावला. चि. सौ. का. माधवी दाभोलकर असे या नववधू चे नाव आहे.

वेंगुर्ले तालुक्यात सर्व केंद्रांवर सकाळी ७.३० वाजल्या पासून शांततेत मतदान सुरू झाले. मतदान केंद्र परुळे ३४/१३ या मतदान केंद्रावर आज सकाळी ८ वाजता बजावला मतदानाचा हक्क. या नववधूने आपल्या मतदानाचा हक्क बजावला आणि ती मतदान केंद्रावर मतदान करुन लग्नाची गाठ बांधण्यासाठी लग्न मंडपात निघाली. येथे केंद्राध्यक्ष म्हणून श्री. रामा पोळजी काम पाहत आहेत.