स्थानिकांच्या हितासाठी आमदार निलेश राणे खंबीरपणे पाठीशी!

सीआरझेड जनजागृती व न्यायालयीन प्रक्रियेसाठी आमदार निलेश राणेंचे भरीव आर्थिक बळ 

 

सीआरझेड जनजागृती समन्वय समितीने मानले आ. निलेश राणे यांचे आभार 

 

 

मालवण | प्रतिनिधी : किनारपट्टी नियमन क्षेत्र (सीआरझेड) कायद्यासंदर्भात स्थानिक रहिवाशांमध्ये जनजागृती करणे तसेच आवश्यक त्या ठिकाणी न्यायालयीन प्रक्रियेसाठी कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे नेहमीच सोबत राहिले आहेत. यासोबत भरीव निधी स्वरूपात ५ लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे. अशी माहिती सीआरझेड जनजागृती समन्वय समितीचे रविकिरण तोरसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

हॉटेल चिवला बीच येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी नगरपरिषद बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, जॉन नरोना, रवींद्र खानविलकर, टीटीडीएसचे अध्यक्ष सहदेव साळगावकर, प्रसन्न मयेकर, रुजाय फर्नाडिस, सुधीर कांदळकर आदी उपस्थित होते.

 

नेहमीच स्थानिकांच्या खंबीरपणे पाठीशी राहत आमदार निलेश राणे यांनी पाठबळ दिले आहे. आताही त्यांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे मालवण आणि परिसरातील किनारपट्टी भागातील स्थानिक रहिवाशांना आणि पर्यटन व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

आमदार निलेश राणे यांनी गेल्या काही महिन्यांत सीआरझेड कायद्यासंदर्भात अतिशय अभ्यासपूर्ण भूमिका विविध स्तरावर मांडली आहे. त्यांनी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, सहकार्य उपलब्ध करून दिले असून मोठा पुढाकार घेतला आहे. स्थानिकांना बळ देण्यासाठी आमदार राणे यांनी स्वतःच्या माध्यमातून ५ लाख रुपयांचा निधी दिला असून, या कामासाठी लवकरच एक पूर्ण वेळ समिती गठित केली जाणार आहे.

 

खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल राखून स्थानिक जनतेच्या हिताचे आवश्यक धोरणात्मक बदल सरकारकडून घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशी माहिती श्री. तोरसकर यांनी दिली. यावेळी

आमदार निलेश राणे यांचे सर्वांनी आभार मानले. हा मार्ग पर्यावरणरक्षणासोबतच स्थानिकांचे जीवन सुकर करणारा ठरेलं, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

सीआरझेड जनजागृती समन्वय समिती प्रतिनिधी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. (अमित खोत, मालवण)