सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संरक्षण अधिग्रहण परिषद (डीएसी) लष्करासाठी शंभरपेक्षा जास्त राफेल लढाऊ विमाने, पी-८ आय मरिटाइम पॅट्रोल आणि अंटी सबमरिन वारफेअर एअरक्राफ्ट तसेच मरिन गॅस टर्बाईन इंजिनसह विविध साहित्य खरेदी करण्याची तयारीत आहे.
अर्थसंकल्पात संरक्षण मंत्रालयासाठी अनेक तरतुदी:
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात संरक्षण मंत्रालयासाठी ७ लाख ८४ हजार ६७८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यातील २ लाख १९ हजार ३०६ लाख कोटी रुपये शस्त्रसाठा लढाऊ विमाने, अत्याधुनिक शस्त्रे, जहाज, पाणबुड्या, ड्रोन आदींवर खर्च केला जाणार आहे.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर:
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन १९ आणि २० फेब्रुवारी रोजी दिल्लीत आयोजित करण्यात येणाऱ्या एआय इम्पॅक्ट समिटसाठी भारतात येत आहेत. मॅक्रॉन भारतात येण्यापूर्वी राफेल विमाने खरेदी प्रस्तावाला तत्त्वतः मान्यता घेतली जाऊ शकते. याशिवाय, अमेरिकेकडून फायटर जेट विमाने खरेदी करण्याच्या रखडलेल्या प्रस्तावावरही पुनर्विचार केला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी शनिवारी दिली. यासाठी – डीएसीची महत्त्वाची बैठक पुढील ३ आठवड्यात दिल्लीत होणार आहे.












