रत्नागिरी Election update : रत्नागिरीतील तालुक्यातील पहा काय लागला निकाल

रत्नागिरी | प्रतिनिधी 

 


वैभव पाटील खेडशी पंचायत समिती गणातून विजयी

हातखंबा जिल्हा परिषद गटातून सुयोग कांबळे 300 मतांनी विजयी

खेडशी जिल्हा परिषद गट मधून हर्षदा गावडे विजयी

नाचणे जिल्हा परिषद गटातून प्रकाश रसाळ विजयी

कर्ला पंचायत समिती गणातून कांचन नागवेकर विजयी

हातखंबा जिल्हा परिषद गटातून सुयोग कांबळे 300 मतांनी विजयी


सुमेश आंबेकर केळये पंचायत समिती गण विजयी
महेंद्र मांडवकर आघाडीवर
रत्नागिरी मध्ये एक परशुराम कदम हे अपक्ष उमेदवार सोडलयास शिवसेना चे सगळे उमेदवार आघाडीवर आहेत


नेताजी पाटील गोळप पंचायत समिती गणनातून 800 मतांनी आघाडीवर

नाचणे जिल्हा परिषद गटातून प्रकाश रसाळ 2000 मतांनी आघाडीवर


🔴रत्नागिरी Breaking : नंदकुमार मुरकर गोळप जिल्हा परिषद गटातून 700 मतांनी आघाडीवर

* उदय बने पडले मागे


🔴रत्नागिरी Breaking : जिल्हा परिषद मध्ये दहा जागां पैकी दोन जागांवर अपक्ष आघाडीवर

तर आठ जागेवर शिवसेना आघाडीवर


रत्नागिरी : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची रत्नागिरी तालुक्याची मतमोजणी आज सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून सामाजिक न्याय भवन येथे मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे. या महत्त्वपूर्ण गोळप, खेडशी गटाचा निर्णय सर्वात पहिला तर वाटद गटाचा निर्णय सर्वात शेवटी लागण्याची शक्यता आहे.

मतमोजणीच्या एकूण प्रक्रियेमध्ये विविध गणांचा समावेश असून, प्रत्येक फेरीनुसार मतमोजणीची विभागणी करण्यात आली आहे. अकरावी फेरी ही प्रामुख्याने गोळप, कळझोंडी, खालगांव आणि खेडशी या गणांसाठी असेल. त्यानंतरच्या बाराव्या फेरीत फणसवळे, नाचणे, भाटये आणि गावखडी या भागांतील मतपेटींमधील कौल स्पष्ट होईल.

टप्याटप्यात नाणिज, कर्ला, साखरतर आणि झाडगांव (म्यु. बाहेर) या गणांचा निकाल १३ व्या फेरीअखेर समोर येण्याची शक्यता आहे. चौदाव्या फेरीमध्ये हातखंबा, कुवारबांव, हरचिरी आणि पावस या महत्त्वाच्या गणांची मतमोजणी पार पडणार आहे.

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात १५ व्या आणि १६ व्या फेरीत कोतवडे, करबुडे आणि नेवरे या गणांचा निकाल जाहीर होईल. सर्वात अखेरची म्हणजे १९ वी फेरी ही वाटद गणासाठी राखीव ठेवण्यात आली असून, याच फेरीनंतर संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. प्रशासनाने प्रत्येक गणासाठी स्वतंत्र टेबल आणि फेरी क्रमांक निश्चित केल्यामुळे मतमोजणी प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडेल, अशी अपेक्षा आहे.

पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्यात आली आहे.तर वाहन पार्कींगची व्यवस्था अन्य ठिकाणीकरण्यात आली आहे.