जिल्हा परिषद निवडणुकीत सावंतवाडी तालुक्यात महायुतीचीच सरशी : उबाठा भुईसपाट

जिल्हा परिषद निवडणुकीत सावंतवाडी तालुक्यात महायुतीचीच सरशी : उबाठा भुईसपाट

 

सावंतवाडी । प्रतिनिधी :सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ चा निकाल आज जाहीर झाला असून, सावंतवाडी तालुक्यातील विविध मतदारसंघांत चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. तालुक्यात ५ जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीने वर्चस्व राखले आहे, तर आरोंदा विभागात शिवसेना तर ३ ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी धक्कादायक विजय नोंदवले आहेत.

तालुक्यातील महत्त्वाच्या मतदारसंघांमधील विजयी आणि पराभूत उमेदवारांची सविस्तर आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

१. माडखोल मतदारसंघ (क्र. ३९)

या मतदारसंघात अपक्ष उमेदवार शिवानी संजय नाईक यांनी बाजी मारली आहे. त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत आपले वर्चस्व सिद्ध केले.

विजयी: शिवानी संजय नाईक (अपक्ष) – ४,३२७ मते

पराभूत: सुप्रिया रवींद्र मडगांवकर (भाजप) – ३,४८० मते

नोटा: २८४

२. आंबोली मतदारसंघ (क्र. ४०)

आंबोलीत भारतीय जनता पार्टीने आपले वर्चस्व कायम राखले आहे.

विजयी: गावडे शोभा गुलाबराव (भाजप) – ४,३९६ मते

पराभूत: सुप्रिया दिनेश गावडे (शिवसेना) – ४,०९७ मते

नोटा: २०१

३. कोलगाव मतदारसंघ (क्र. ४१)

कोलगावमध्ये अत्यंत चुरशीच्या लढतीत अपक्ष उमेदवाराने भाजपच्या दिग्गज उमेदवाराला धूळ चारली आहे.

विजयी: मायकल फ्रान्सीस डिसोजा (अपक्ष) – ४,२१४ मते

पराभूत: महेश रमेश सारंग (भाजप) – ३,८७८ मते

नोटा: १३८

४. तळवडे मतदारसंघ (क्र. ४२)

तळवडे मतदारसंघात भाजपचे संदीप गावडे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे.

विजयी: गावडे संदीप एकनाथ (भाजप) – ६,३८१ मते

पराभूत: रुपेश गुरुनाथ राऊळ (शिवसेना – उबाठा) – ३,८५५ मते

नोटा: १२३

५. माजगाव मतदारसंघ (क्र. ४३)

माजगावमध्ये भाजपने शिवसेना (उबाठा) उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव केला.

विजयी: विक्रांत विकास सावंत (भाजप) – ५,१४१ मते

पराभूत: दिनेश बाबला सावंत (शिवसेना – उबाठा) – १,६६५ मते

नोटा: ४०१

६. इन्सुली मतदारसंघ (क्र. ४४)

इन्सुलीत अपक्ष उमेदवाराने शिवसेनेला धक्का देत विजय खेचून आणला आहे.

विजयी: नितीन एकनाथ राऊळ (अपक्ष) – ३,८६४ मते

पराभूत: शावियर जॉकी फर्नांडीस (शिवसेना) – २,७६० मते

नोटा: २४३

७. मळेवाड मतदारसंघ (क्र. ४५)

मळेवाडमध्ये भाजपने शिवसेनेच्या उमेदवारावर मात करत विजय मिळवला.

विजयी: अपर्णा वसंत सातोस्कर (भाजप) – ४,५६९ मते

पराभूत: प्रियांका सर्वेश नारोजी (शिवसेना) – ३,२४६ मते

नोटा: २१०

८. आरोंदा मतदारसंघ (क्र. ४६)

आरोंद्यात शिवसेनेने आपली ताकद दाखवून देत विजय नोंदवला आहे.

विजयी: सुदन सोनू कवटणकर (शिवसेना) – ३,३८६ मते

पराभूत: सर्वाणी

शेखर गांवकर (अपक्ष) – २,३४५ मते

नोटा: १७४


बांदा पंचायत समितीत अपक्ष ऋतिका नाईक विजयी

सावंतवाडी : बांदा पंचायत समिती मतदार संघात अपक्ष ऋतिका नाईक विजयी झाल्या. त्यांनी भाजपच्या रुपाली शिरसाट यांचा पराभव केला.


आरोंदा जिल्हा परिषद मतदार संघात महायुतीचे सुदन कवठणकर विजयी

सावंतवाडी : आरोंदा जिल्हा परिषद मतदार संघात महायुतीचे सुदन कवठणकर विजयी झाले. आरोंदा पंचायत समिती गणात महायुती म्हणजेच भाजपच्या नेहा कांबळी तर सातार्डा पंचायत समिती मतदार संघात उबाठाचे उदय पारिपत्ये विजयी झाले.


मळेवाड जिल्हा परिषद गटात भाजपच्या अपर्णा सातोसकर विजयी

सावंतवाडी : मळेवाड जिल्हा परिषद गटात भाजपच्या अपर्णा सातोसकर विजयी झाल्या. तर मळेवाड पंचायत समिती गणात भाजपच्या धनश्री हेमंत मराठे विजयी तर न्हावेली पंचायत समितीत शिवसेनेचे शरद धाऊसकर विजयी झाले.


ओटवणे (प्रतिनिधी ) माजगाव जिल्हा परिषदेवर युतीने विजय संपादन केला असून या भागातून जिल्हा परिषदेचे उमेदवार विक्रांत सावंत हे मोठया विक्रमी मताधिक्याने विजयी झाले असून माजगाव जिल्हा परिषदेवर भाजप चे तर चराठा पंचायत समिती शिंदे गटाचे वर्चस्व राहिले.चराठा पंचायत समिती मधून उत्कर्षां गावकर यांनी अपक्ष उमेदवार तन्वी परब आणि अपक्ष समीक्षा सहदेव गावकर यांचा पराभव करत विजय संपादन केला तर माजगाव पंचायत समिती मधून जितेंद्र गावकर यांनी सचिन बिर्जे यांचा पराभव करत विजय मिळवला.जिल्हा परिषद उमेदवार विक्रांत सावंत यांना 5141 तर उबाटा गटाचे उमेदवार दिनेश सावंत 1665 एवढे मतदान झाले विक्रांत सावंत यांनी 3476 च्या मोठ्या लीड ने विजय मिळवला


इन्सुली जिल्हा परिषद गटात अपक्ष नितीन राऊळ विजयी

सावंतवाडी : इन्सुली जिल्हा परिषद गटात अपक्ष नितीन राऊळ

विजयी तर इन्सुली पंचायत समिती गणात अपक्ष उमेदवार सदाशिव राणे विजयी झाले. शेर्ले पंचायत समितीत यापूर्वीच भाजपचे महेश धुरी बिनविरोध निवडून आले होते.


माजगांव जिल्हा परिषद गटात भाजपचे विक्रांत सावंत विजयी

सावंतवाडी : माजगांव जिल्हा परिषद गटात भाजपचे विक्रांत सावंत हे तब्बल ३४७६ मताधिक्याने विजयी झाले. तर माजगांव पंचायत समिती गणात अपक्ष जितेंद्र गांवकर विजयी तर चराठा पंचायत समितीत महायुतीच्या उत्कर्षा गांवकर विजयी झाल्या.


तळवडे जिल्हा परिषद मतदार संघात भाजपचे संदीप गावडे विजयी

सावंतवाडी : तळवडे जिल्हा परिषद मतदार संघात भाजपचे संदीप गावडे विजयी झाले.

मळगांव पंचायत समिती गणात भाजपचे गौरव मुळीक तर तळवडे पंचायत समिती मतदार संघात महायुतीच्या सुश्मिता जाधव विजयी झाल्या आहेत.


सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापतीपदी महायुतीचा विजय 

 

तळवडे पंचायत समिती सदस्यपदी महायुतीच्या सुश्मिता जाधव विजयी 

सावंतवाडी : सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापतीपदी महायुतीचा विजय झाला असून हा मतदारसंघ अनुसुचित जातीसाठी आरक्षित होता. या ठिकाणी तळवडे पंचायत समिती सदस्यपदी महायुतीच्या सुश्मिता जाधव विजयी झाल्याने त्यांचे सभापती पद निश्चित झाले आहे.

 


कोलगांव जिल्हा परिषद गटात अपक्ष मायकल डिसोझा विजयी

सावंतवाडी : कोलगांव जिल्हा परिषद गटात अपक्ष मायकल डिसोजा

विजयी तर कोलगांव पंचायत समिती गणात शिवसेनेच्या उमेदवार प्रणाली टिळवे विजयी तर कारीवडे पंचायत समितीत भाजपच्या प्राजक्ता केळुसकर विजयी झाल्या.


आंबोली जिल्हा परिषद मतदार संघात भाजपच्या शोभा गावडे विजयी

सावंतवाडी : आंबोली जिल्हा परिषद मतदार संघात भाजपच्या शोभा गावडे विजयी तर

आंबोली पंचायत समितीत शिवसेनेचे मायकल डिसोझा

तर विलवडे पंचायत समितीत भाजपचे प्रशांत सुकी विजयी झाले.

 


जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या दोन्ही जागांवर अपक्षांचाच विजय 

सावंतवाडी : माडखोल मतदार संघात जिल्हा परिषद गटातून अपक्ष उमेदवार शिवानी संजय नाईक विजयी झाल्या. तर पंचायत समिती गणांमध्ये अपक्ष उमेदवार प्रथमेश राऊळ व अवनी राऊळ यांचा विजय झाला. या ठिकाणी भाजपच्या उमेदवार सुप्रिया रविंद्र मडगांवकर यांना पराभवाचा सामना करावा लागला.

अपक्ष शिवानी संजय नाईक यांना ४३२७ तर भाजपच्या उमेदवार

सुप्रिया मडगांवकर यांना ३४८० मते मिळाली. माडखोल पंचायत समिती गणात अपक्ष अवनी राऊळ यांना १९२० तर महायुतीच्या

अनिता राऊळ यांना १२१६ मते मिळाली तर

तर कलंबिस्त पंचायत समिती मतदार संघात अपक्ष प्रथमेश राऊळ यांना २६१२ तर महायुतीचे रमाकांत राऊळ १४१४ मते तर उबाठाचे पंढरी लक्ष्मण राऊळ २७२ मिळाली.