खासदार नारायण राणेंच्या निधीतुन सोलर लाईटचे काम
सामाजिक कार्यकर्ते जब्बार काझी यांच्या प्रयत्नांना यश
राजापूर प्रतिनिधी :दिलले आश्वासन पुर्ण करणे ही राणे कुटुंबीयांची खासीयत आहे. याची प्रचिती राजापूर तालक्यातील दळे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या दळे, तुळसुंदे, होळी, वाघ्रण या गावांना आली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतुन या गावांमध्ये सोलर लाईट (पथदिप) बसविण्यात आल्या असून यामुळे या गावांतील ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली आहे.
राजापूर तालक्यातील दळे ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या दळे, तुळसुंदे, होळी, वाघ्रण या गावांमध्ये सोलर लाईट (पथदिप) बसवावेत अशी स्थानिकांची मागणी होती. या कामासाठी या भागातील सामाजिक कार्यकर्ते जब्बार काझी यांनी कुडाळ मालवणचे आमदार व या विभागाचे माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्फत खा. नारायण राणे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश आले व या कामासाठी खा. राणे यांनी ५ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला. यातुन या भागात २२ सोलर लाईट बसविण्यात आल्या आहेत. या गावांमधील रस्ते व सार्वजनिक ठिकाणी आवश्यक तेथे या लाईट बसविण्यात आल्या आहेत. यामुळे ही गावे प्रकाशमान झाली आहेत. या सोलर लाईटमुळे (पथदिप) गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांचा रात्रीचा प्रवास सुखकर व सुरक्षित होणार आहे.
खासदार राणे यांनी या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल,तसेच त्यांचे स्विय सहाय्यक योगेश मगदूम यांनी यासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल त्यांचे ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले आहेत. तर या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावल्याबद्दल जब्बार काझी यांचेही ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.













