दापोली | प्रतिनिधी : दाभोळ येथील टेमकरवाडी येथे दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन वाडीतील 35 कुटुंबांना स्थलांतर करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. या कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे योग्य जागा उपलब्ध होत नसेल तर श्री दत्त मंदिर वरचा विभाग दाभोळ व जिल्हा परिषद शाळा येथे स्थलांतरांची व्यवस्था करण्यात आली आहे स्थलांतर करण्याच्या काही अडचण आल्यास ग्रामपंचायत इकडे संपर्क साधावा असे नोटीसित म्हटले आहे मात्र विशाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर महसूल प्रशासनाने दाभोळ येथील टेमकरवाडी येथील या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहेत.











