डिस्टिंक्टिव्ह एज्युकेशन सोसायटी दापोलीचे उपाध्यक्ष कै. रामचंद्र महादेव राजपुरे यांचे दुःखद निधन

दापोली (विशेष प्रतिनिधी) – डिस्टिंक्टिव्ह एज्युकेशन सोसायटी दापोलीचे उपाध्यक्ष, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणारे कै. रामचंद्र महादेव राजपुरे यांचे आज मंगळवार, दिनांक १० फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने गिम्हवणे येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने कळंबट परिसरासह दापोली तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कै. राजपुरे हे अध्यक्ष श्रीदेव धावजी देवस्थान ट्रस्ट, कळंबट, उपाध्यक्ष रामराजे महाविद्यालय, माजी सरपंच कळंबट, माजी चेअरमन कळंबट विकास सोसायटी, माजी पंचायत समिती सदस्य तसेच खरेदी-विक्री संघ दापोलीचे माजी संचालक म्हणून त्यांनी विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या होत्या. सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य सर्वपरिचित होते.
त्यांचा स्वभाव मनमिळावू, कार्यतत्पर आणि सर्वसामान्यांच्या अडचणींना तत्काळ प्रतिसाद देणारा होता. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. त्यांच्या निधनाने एक अनुभवी, अभ्यासू आणि समाजभिमुख नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
कै. रामचंद्र महादेव राजपुरे हे डिस्टिंक्टिव्ह एज्युकेशन सोसायटी दापोलीचे उपाध्यक्ष तसेच श्री. संदीप राजपुरे सर यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात कुटुंबीय, आप्तस्वकीय आणि मोठा सामाजिक परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा उद्या बुधवार, दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता कळंबट (राजपुरेवाडी) येथील त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे.