राजापूर (वार्ताहर): शहरानजीकच्या शीळ येथील ज्ञानसागर वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष व जुवाठी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक बी. के. गोंडाळ यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले. त्यांची शोकसभा शनिवार दि. १४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता शीळ येथे ज्ञानसागर वाचनालय सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
या सभेत त्यांना श्रध्दांजली वाहण्यात येणार असून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे. तरी यावेळी त्यांचे मित्र परिवार, सहकारी, हितचिंतक यानी उपस्थीत राहण्याचे आवाहन ज्ञानसागर वाचनालय, सर्वोदय प्रतिष्ठान आणि शीळ ग्रामस्थांचे वतीने करण्यात आले आहे.











