देवगड / प्रतिनिधी : तालुक्यातील पोयरे मशवीवाडी येथील सुमारे ४० एकर क्षेत्रावरील अनेक कलम बागा आगीत होरपळल्या आहेत. यात तेथील बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. देवगड तहसीलदार रमेश पवार यांच्या यांच्या आदेशाने तलाठी सुभाष नाडे, पोलीस पाटील संतोष केसरकर आणि कृषी सेवक श्री. मापारी यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. या घटनेत तेथील तेजस मयेकर यांची ३०० कलमे, रुपेश पाटील यांची १२ कलमे, नंदू पाटील यांची १३ कलमे, विलास पाटील यांची २० कलमे, मनोहर राणे यांची ११ कलमे, संभाजी राणे यांची १० कलमे, मीना पाटील यांची १५ कलमे, वसंत पाटील यांची १२ कलमे, गीता मालपेकर यांची ७ कलमे, राजेश वळंजू यांची २५ कलमे, मधू सावंत यांची ४ कलमे, श्री. राणे यांच्या तीन कलमांचे नुकसान झाले आहेत. या घटनेचा पंचनामा महसूल विभागाच्यावतीने करण्यात आला आहे.












