ओटवणेत आज एकपदा अर्थात “पृथ्वी कंकण” नाट्य प्रयोग

ओटवणे(प्रतिनिधी ) आतुरता ग्रुप ओटवणे गावठणवाडी आयोजित श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूर कुडाळ यांचा एकपदा अर्थात “पृथ्वी कंकण” हा ट्रिकसिन युक्त दशावतार नाट्यप्रयोग आज गुरुवारी 12 फेब्रुवारी रोजी ठीक 8 वाजता सातेरी रवळनाथ मंदिरात सादर होणार आहे.या नाटकात मातब्बर कलाकारांच्या भूमिका सह या नाटकात महाबलीची आसुरी भक्ती,पंचमुखी शंकराचे विराट रूप,दर्शन,ऐरावतावरून इंद्राचे आगमन,नागलोकाचा नयनरम्य देखावा,नागलोकात अधांतरी शेशनाग,सिंहावर आरूढ देवी रोहिणी,कारागृहाचा दरवाजा आपोआप उघडणे एकपदा दर्शन आदिसह अनेक ट्रिकसिन ने नटलेल्या या नाट्य प्रयोगाचा नाट्य रसिकानी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आतुरता ग्रुप ओटवणे गावठणवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.