गुहागर प्रतिनिधी:
कोंडकारुळ पंचायत समिती गणातून विजयी झाल्यानंतर तरुण नेतृत्व म्हणून पुढे आलेले प्रणव पोळेकर यांनी रत्नागिरी येथे जाऊन पालकमंत्री उदयजी सामंत यांची भेट घेतली. या भेटीमुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
विजयानंतर प्रथमच अधिकृतपणे पालकमंत्र्यांची भेट घेतल्याने या भेटीकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे. यावेळी तालुक्यातील विकासकामे, कोंडकारुळ गणातील प्रलंबित प्रश्न तसेच आगामी पंचायत समितीच्या कामकाजाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
प्रणव पोळेकर हे कोंडकारुळ गणातून दमदार विजय मिळवत पंचायत समितीत दाखल झाले आहेत. तरुण, अभ्यासू आणि कार्यकर्त्यांमध्ये सतत संपर्क ठेवणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक राजकीय हालचालीकडे लक्ष लागलेले आहे.
रत्नागिरीतील या भेटीत पुढील विकास आराखड्यांबाबत मार्गदर्शन घेतल्याचे सांगितले जात असून, तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा संदेश कोळेकर यांनी दिला आहे. या भेटीनंतर गुहागर तालुक्यातील राजकीय समीकरणांना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात
आहे.












