शेतकरी सभेत संघर्ष समिती स्थापन : अध्यक्षपदी संतोष गोखले यांची निवड
वेंगुर्ले : दाजी नाईक
दाभोली गाव आणि परिसरातील शेतकरी बागायतदार वानर व शेकरू या वन्य प्राण्यांच्या उपग्रहामुळे त्रस्त झाले आहोत. या प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या फळांचे मोठे नुकसान होत आहे. यावर ठोस कारवाई करण्यासाठी शासन दरबारी योग्य ती उपाययोजना व्हावी म्हणून संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. व संतोष गोखले यांची समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
दाभोली कोऱ्याचीवाडी येथील गणपती मंदिर नजीक श्री. मंगलमूर्ती मंगल कार्यालयात शेतकरी सभा आयोजित करण्यात आली होती. सभेत व्यासपीठावर सरपंच श्री.उदय गोवेकर, वनविभाग अधिकारी सावळा कांबळे, सहाय्यक कृषी अधिकारी जीवन परब, ग्रामपंचायत अधीकारी श्री. संतोष पिंगुळकर व मोठ्या संख्येने शेतकरी, बागायतदार व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शेकरू, वानर या वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शेती, बागायती यांचे दररोज होणारे नुकसान शेतकरी बागायतदार यांच्या उद्याच्या भविष्याशी थेट संबंधित आहे. त्यामुळे यावर ठोस निर्णय होणे गरजेचे आहे. शेतकरी बागायतदार मेहनतीने आपली शेती बागायती करत असतात. मात्र हाता तोंडाशी आलेला घास हे वन्य प्राणी हिरावून नेतात आणि नुकसान करतात. यावेळी शेतकरी व बागायतदार यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. सभेचे सूत्रसंचलन व आभार अण्णा जोशी यांनी मानले.













