मसुरे | झुंजार पेडणेकर : त्रिंबक येथील श्री रामेश्वर मंदिरात द्वितीय वर्धापन दिन सोहळ्या निमित्त १३ फेब्रुवारी ते रविवार १५ फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक, आध्यात्मिक आणि मनोरंजनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१४ फेब्रुवारी रोजी दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे:
सकाळी ०९.०० वा.: श्री सत्यनारायणाची महापूजा,
दुपारी १२.०० वा.: श्री सत्यनारायणाची महाआरती,
दुपारी ०१.०० वा.: महाप्रसाद,
दुपारी ०३.०० वा हळदी-कुंकू समारंभ,(सौजन्य – गांवकर कुटुंब, पलीकडील वाडी), रात्री ०७.३० वा.: ‘गुरुकृपा पंचक्रोशी भजन मंडळ चिंदर’ यांचा भजनाचा कार्यक्रम. बुवा – श्री. तुषार परब व शिष्य मंडळ.
रात्री ०९.०० वा.: सत्कार समारंभ.
विशेष आकर्षण: दशावतार नाट्य प्रयोग
उत्सवाचे खास आकर्षण म्हणून १०.०० वाजता श्री. गिरीश बाणे यांच्या सौजन्याने लोकराजा श्री. सुधीर कलिंगण प्रस्तुत ‘श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरूर (कुडाळ)’ यांचा भव्य ट्रिकसीनयुक्त नाट्य प्रयोग होणार आहे. यावेळी ‘एकपदा अर्थात पृथ्वीकंकण’ हे धडाकेबाज नाटक सादर केले जाईल. उपस्थितीचे आवाहन श्री देव रामेश्वर मंदिर समिती आणि ग्रामस्थांनी केले आहे.












