भाजपाचे नुतन पंचायत समिती सदस्य शैलेश खामकर यांनी घेतली प्रदेशाध्यक्षांची भेट

लांजा (प्रतिनिधी) :भांबेड पंचायत समिती गणातून निवडून आलेले भाजपाचे नुतन पं.स.सदस्य शैलेश खामकर यांनी नुकतीच भाजपा प्रदेशाध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यामध्ये लांजा तालुक्यातील भांबेड पंचायत समिती गणातून भाजपाचे तालुकाध्यक्ष शैलेश खामकर हे निवडणुकीत उभे होते.‌ या गणातील निवडणूक लक्षवेधी ठरलेली होती.‌मात्र शैलेश खामकर यांनी विजय खेचून आणला होता.‌
विजयी झाल्यानंतर त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शैलेश खामकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.‌यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत मांडवकर हे उपस्थित होते.