गुहागर: वेळणेश्वर येथील एका माळरानावरील काजूच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून एका ४५ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विठ्ठल उमलू चव्हाण (वय ४५, रा. विजापूर, सध्या रा. वेळणेश्वर इंजिनिअरिंग कॉलेजसमोर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात १५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री २१:४२ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस माहितीनुसार, ही घटना १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११:०० ते संध्याकाळी ५:०० वाजण्याच्या दरम्यान मौजे वेळणेश्वर येथील एका माळरानात घडली. मृत विठ्ठल चव्हाण यांनी दारूच्या नशेत असताना काजूच्या झाडाच्या फांदीला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतला, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.












