नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या अपूर्वा बारगोडे यांचा ग्रामसभेत सत्कार

गुहागर | प्रतिनिधी
कोंडकारूळ जि. प. गटातील नवनिर्वाचित जि. परिषद सदस्या अपूर्वा अनंत बारगोडे यांचा वेळंब ग्रामपंचायतीच्या व गावांतील ग्रामस्थांच्या वतीने दिनांक नुकताच ग्रामसभेत सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच वसंत पिंपळे व तंटामुक्ती अध्यक्ष संतोष नांदलस्कर यांच्या हस्ते गावाच्या अपूर्वा बारगोडे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी वेळंब गावच्या रहिवाशी असलेल्या अपूर्वा बारगोडे यांना युतीच्या माध्यमातून भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती. जनतेशी जुळलेली नाळ व तळागाळातील लोकांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळून देण्यासाठी त्यांनी केलेले काम यामुळे त्यांना जनतेने भरघोस मतांनी निवडून दिले आहे.त्यांच्या या विजयाबद्दल त्यांचा वेळंब ग्रामपंचायतच्यावतीने नुकताच ग्रामसभेत सत्कार करण्यात आला.