शंकर पाटणकर यांचे निधन

मसुरे (प्रतिनिधी ):  जोगेश्वरी मुंबई येथील आदर्श शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष तथा सल्लागार शंकर बाळू पाटणकर (८८ वर्ष )

यांचे दु:खद निधन झाले. शंकर पाटणकर हे आदर्श शिक्षण समितीच्या संस्थेच्या सुरूवाती पासूनच्या काळापासून क्रियाशील आजीव सदस्य होते. संस्थेबद्दल नेहमीच आस्था बाळगणारे व भावनिक प्रेम असणारे ,वाढत्या वयातही त्यांचा प्रत्येक कार्यक्रमात सहभाग असायचा. नवीन कार्यकर्त्याना कामात उत्साह वाढविण्याचा व मार्गदर्शन करण्यासाठी ते नेहमी अग्रेसर असायचे. कार्यकर्ता असो वा संस्थेचा सभासद त्याना मार्गदर्शन करून त्याची उमेद वाढवित असत. कणकवली, वैभववाडी तालुक्यातील कार्यकर्ते व सभासद करण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा होता. तसेच संस्थेच्या विकासकामात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले कार्यकर्ते आज आदर्श शिक्षण समिती मुंबई हि संस्था चालवित आहेत.वयोवृद्ध होऊनही ते संस्थेच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहात असत. संस्थेच्या प्रगतीसाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे.त्याना संस्थेच्या वतीने माजी सरचिटणीस शांताराम गोवळकर, उपाध्यक्ष अनंत दाभोळकर यानी श्रध्दांजली वाहिली. पश्चात एक विवाहित मुलगा, दोन विवाहित मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे.