पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा शनिवारी

रत्नागिरी : जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टिने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन शनिवार दि. 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यत, स्थळ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नाचणे रोड, पोस्ट एमआयडीसी, येथे करण्यात आले आहे. तरी जिल्हयातील खासगी आस्थापनांनी महास्वयंम वेबपोर्टलच्या माध्यमातून रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा, असे आवाहन कोशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे प्र.सहाय्यक आयुक्त मो. ए. दुधाळ यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापनांना / उद्योजकांना आपणांकडे उपलब्ध असलेली रिक्त पदे www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर अधिसूचित करावी. जिल्हयातील सर्व खाजगी आस्थापनांनी/उद्योजकांनी आपणांस देण्यात आलेला युझर आयडी व पासवर्ड चा वापर करुन रिक्तपदे ऑनलाईन अधिसूचित करावी व प्रत्यक्ष रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उमेदवारांची निवड करुन रोजगार उपलब्ध करुन देण्यात यावा. रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी नसल्यास कृपया या कार्यालयाकडे त्वरीत संपर्क साधून नोंदणी करावी व रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.