खेड (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाची संधी मिळावी या उद्देशाने घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लवेल येथे कान्हे पिंपळी–चिपळूण येथील आयटीआयच्या १८ विद्यार्थ्यांसाठी ४८ तासांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
या प्रशिक्षणात डॉ. समीर एस. गजमल आणि श्री. पी. व्ही. वाटेगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना विविध मशीन ऑपरेशन्सचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी टर्निंग जॉब मूल्यांकन पूर्ण करून प्रमाणपत्रे प्राप्त केली. प्रशिक्षणासाठी लागणारे सर्व साहित्य महाविद्यालयामार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात आले होते.
हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमाबद्दल कान्हे पिंपळी आयटीआयच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.











