मसुरे | झुंजार पेडणेकर :बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवनदर्शन स्पर्धा परीक्षेचा बक्षीस समारंभ संपन्न झाला.
प्रमुख वक्ते संजय पेंडूरकर यांनी सेवांगणच्या या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. संविधान निर्मिती हे बाबासाहेबां चे अलौकीक कार्य असून
त्या प्रमाणे वागणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यांचे कार्य दलीत समाजापुरते मर्यादित नसून समाजातील सर्व घटकांसाठी त्यांनी काम केले. त्याबद्दल त्यांच्याविषयी कृतज्ञता असणे आवश्यक आहे असे त्यांनी प्रतिपादन केले.
ओसरगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय मर्डे, संगीत विद्यालयाचे संचालक अर्जून पेंडूरकर यानीही डॉ आंबेडकर यांच्या जीवन चरित्रा विषयी माहिती दिली.
सेवांगणचे विश्वस्त दीपक भोगटे यानी
या स्पर्धा परीक्षेची माहिती दिली. मालवण तालुक्यातील २५ हायस्कूल
१० प्राथमिक शाळा गोव्यातील ४ हायस्कूल व परिसरातील ३ हायस्कूल यामधील मधील ४ हजार विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले.२०० गुणवंत विद्यार्थ्याना
वडाचापाट, कट्टा येथे
बक्षीस वितरण संपन्न झाले असून
मालवण येथे १९ रोजी दुपारी ३ वाजता
बक्षीस समारंभ असल्याचे त्यांनी सांगितले.
पोखरण हायस्कूलचे विद्यार्थी
हर्षदा संदीप गावकर व विक्रांत विश्वनाथ सावंत
यानी अत्यंत प्रभावीपणे परीक्षेचे विश्लेषण केले. व ही परीक्षा आम्हा विद्यार्थ्यांसाठी खूपच मार्गदर्शक ठरल्याचे सांगितले.गुणवंत विद्यार्थ्याना मान्यवरांचे हस्ते प्रशस्तीपत्र शैक्षणिक साहित्य व सहभागी सर्व शाळाना फ्रेम केलेले अभिनंदन पत्र देण्यात आले.
या कार्यक्रमास संजय पेंडूरकर, अर्जून पेंडूरकर,मळगावकर सर, मर्डे सर, महाभोज सर, किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, शोभा म्हाडगुत, रमेश म्हाडगुत, दीपक भोगटे, अर्चना धुत्रे, मंगल पराडकर, साक्षी अमरे, मनोज काळसेकर, विद्या चिंदरकर, बाळकृष्ण गोंधळी, मारुती चव्हाण,शिवण क्लासच्या विद्यार्थिनी विद्यार्थी व पालक उपस्थित होते.












