कोदवली येथील लाकूड व्यापारी शंकर जामसांडेकर यांचे निधन

राजापूर (वार्ताहर): राजापूर तालुक्यातील कोदवली येथील रहिवासी व नामांकित लाकूड तसेच ट्रक व्यावसायिक काँग्रेसचे कार्यकर्ते शंकर विष्णू जामसांडेकर (६५) यांचे मंगळवार १७ फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
त्यांचे मूळ गाव खारेपाटण परंतु ते व्यवसायानिमित्त राजापूर तालुक्यातील कोदवली येथे स्थायिक झाले होते. मंगळवारी त्यांना सायंकाळी हृदयविकाराचा तिव्र झटका आला त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
लाकूड व्यवसायाच्या निमित्ताने त्यांची तालुक्यात ओळख होती. तसेच कोदवली आणि दशक्रोशीत त्यांचे अनेकांशी जिव्हाळयाचे संबंध होते. आपल्या
मितभाषी स्वभावामुळे ते ओळखले जात. सामाजिक कार्यकर्ते अरविंद लांजेकर यांचे ते मामा होत.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, तीन विवाहीत मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.