विजयदुर्ग ( प्रतिनिधी ) : गेले अनेक वर्ष रखडलेल्या रामेश्वर गोदी या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ नुकताच रामेश्वर सरपंच मोनिका टुकरुल तसेच जि. प. सदस्य संजय बोंबडी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तिर्लोट पंचायत समिती सदस्य रवींद्र तिर्लोटकर, विजयदुर्ग सरपंच रियाज काजी तसेच नासिर मुकादम, संतान फर्नांडिस, शाबीन परेरा, विनोद सुके, ग्रेसीस फर्नांडिस व अन्य मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. हा रस्ता जिल्हा नियोजन अंतर्गत होत असून यामुळे रामेश्वर गावातील गोदीवाडी ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.












