मुंबई सीएसएमटी–करमळी विशेष रेल्वेची घोषणा; कोकण मार्गावरील प्रवाशांना दिलासा

मुंबई ते गोवा दरम्यान वाढलेल्या प्रवासी गर्दीचा विचार करून कोकण रेल्वे प्रशासनाने मुंबई सीएसएमटी–करमळी–मुंबई सीएसएमटी दरम्यान विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वे क्रमांक 01129 मुंबई सीएसएमटी–करमळी विशेष ही गाडी 26 जून 2026 रोजी पहाटे 12.20 वाजता मुंबई सीएसएमटी येथून सुटणार असून त्याच दिवशी दुपारी 2.40 वाजता करमळी येथे पोहोचणार आहे.

तर 01130 करमळी–मुंबई सीएसएमटी विशेष ही गाडी 28 जून 2026 रोजी सायंकाळी 4.30 वाजता करमळी येथून सुटून पुढील दिवशी पहाटे 5.25 वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहोचणार आहे.

या विशेष गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवीम या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

या विशेष रेल्वेमध्ये एकूण 22 डबे असणार असून त्यामध्ये 2 टियर एसीचा 1 डबा, 3 टियर एसीचे 6 डबे, स्लीपरचे 9 डबे, जनरलचे 4 डबे आणि एसएलआरडीचे 2 डबे समाविष्ट आहेत.

प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.