जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या सह पदाधिकारी व शिवप्रेमींची उपस्थिती
वेंगुर्ले : दाजी नाईक
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आज वेंगुर्ले माणिकचौक येथे भाजप च्या वतीने महाराजांच्या पुतळ्याला जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शौर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम म्हणत श्री. दळवी नतमस्तक झाले.
यावेळी वेंगुर्ले चे नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजपा तालुका अध्यक्ष पप्पू परब, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, आंबा बागायतदार जगन्नाथ सावंत, नगरसेवक प्रणव वायंगणकर, संदेश निकम, प्रीतम सावंत, नगरसेविका गौरी मराठे, रिया केरकर, सुमन निकम, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर तसेच रोहित वेंगुर्लेकर, प्रथमेश यंदे, नितीश कुडतरकर, विनय गोगटे, सौरभ बेहेरे, उदय मालवणकर, लौकिक परब, सौरभ माळी, मेस्त्री, किशोर सोनसुरकर सर, प्रमोद वेर्णेकर यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.












