राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. एप्रिल २०२६ मध्ये सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने राज्यसभेसाठी निवडणूक होणार आहे. देशभरातील विविध राज्यांतील जागांसाठी मतदान होणार असून त्यामध्ये महाराष्ट्रातून सर्वाधिक ७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातील ७ जागांसाठी होणारी ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. विधानसभेतील पक्षीय संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेत महायुतिचे ६ तर महाविकास आघाडीचा १ उमेदवार राज्यसभेवर निवडला जाऊ शकतो.
कुणाचे किती संख्याबळ?
भाजप – १३१
शिवसेना – ५७
राष्ट्रवादी (अजित पवार) – ४०
उबाठा – २०
काँग्रेस – १६
राष्ट्रवादी (शरद पवार) – १०
अपक्ष आणि इतर – १२
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे विधानसभेतील २ जागा रिक्त आहेत.
मतांचे गणित कसे असेल?
राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी पहिल्या पसंतीच्या ३७ मतांची गरज आहे. पक्षीय बलानुसार भाजपचे ४, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा प्रत्येकी १, महविकास आघाडीचा १ उमेदवार निवडून जाऊ शकतो.
महाराष्ट्रातून एनडीएचे निवडणूक कार्यक्रम:
अधिसूचना : २६ फेब्रुवारी
उमेदवारी अर्ज अंतिम मुदत : ५ मार्च
उमेदवारी अर्जाची छाननी : ६ मार्च
अर्ज माघारीची मुदत : ९ मार्च
मतदान : १६ मार्च (स. ९ ते संध्या. ४)
मतमोजणी : १६ मार्च (संध्या. ५ पासून)












