‘ज्ञानदीप विद्या संकुल’ भडगावचा रौप्य महोत्सवी ‘स्नेहगंध’ ३ व ४ एप्रिल रोजी

खेड (प्रतिनिधी) — खेड तालुक्यातील भडगाव येथे ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) संचालित विविध शैक्षणिक संस्थांचा रौप्य महोत्सवी वार्षिक स्नेहगंध कार्यक्रम ‘स्नेहगंध 2025-26’ मोठ्या उत्साहात ३ व ४ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. या वर्षी या स्नेहगंध कार्यक्रमाचे पंचविसावे वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री. रामचंद्र धोंडशेट पाटणे ज्ञानदीप विद्यामंदिर (पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभाग), कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर (माध्यमिक विभाग) तसेच कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर (उच्च माध्यमिक विभाग) या प्रशालांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम ज्ञानदीप विद्या संकुल, भडगावच्या प्रांगणात संपन्न होणार आहे.
या सोहळ्याचे उद्घाटन जीवनश्री प्रतिष्ठान, गुहागरचे अध्यक्ष मा. श्री. संतोष धाकटू वरंडे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून प्रथितयश उद्योजक मा. शामकांत शांताराम खातू व लायन्स क्लब गुहागर सिटीचे अध्यक्ष मा. सचिन सदानंद मुसळे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अरविंद तोडकरी हे भूषविणार आहेत.
३ एप्रिल रोजी पहिल्या दिवशी सकाळी ९ ते १२ या वेळेत “King of DVMK” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी ६.३० ते रात्री १० वाजेपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. ४ एप्रिल रोजी दुसऱ्या दिवशी सकाळी ९ ते १२ या वेळेत “Funny Game” चे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी ६.३० ते रात्री १० पर्यंत पुन्हा एकदा रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
या रौप्य महोत्सवी ‘स्नेहगंध 2025-26’ कार्यक्रमास सर्व पालक, हितचिंतक व देणगीदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक राजकुमार मगदूम तसेच प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पूर्वा मोरे यांनी केले आहे.