मसुरे मार्गाचीतड येथे शिवजयंती उत्सव संपन्न!

मसुरे | झुंजार पेडणेकर : मसुरे मार्गाचीतड येथील गणेश मंदिर येथे शिवजयंती उत्सव उत्साहात संपन्न झाला. विनायक उर्फ राजू गोरे यांनी विधिवत पूजन केले. यावेळी पोलीस पाटील साईप्रसाद बागवे, सत्यविजय भोगले, अमित बागवे, सचिन गोलतकर, भूषण मसुरेकर, बंटी मसुरेकर, संजय परब, रोशन पाताडे, गोपाळ ठाकूर, दिलीप परब, बाबू परब, संकेत गोलतकर आदी उपस्थित होते.