BREAKING: गणपतीपुळे येथे तिघे बुडाले;एकाचा मृत्यू

रत्नागिरी : प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री गणपतीपुळे येथे देवदर्शन आणि पर्यटनासाठी आलेल्या तिघेजण तिथल्या समुद्रात बुडाले

ही घटना शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास घडली

ही माहिती मिळताच जीवरक्षकांनी समुद्रात धाव घेऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तिघांपैकी एकाचा मृत्यू झाला असून दोघांना उपचाराला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

हे तिघेजण मुंबईहून गणपतीपुळे येथे आले होते

तेथील लॉजवर ते वास्तव्यास होते अशी प्राथमिक माहिती उपलब्ध होत आहे