राजकोट | आमदार निलेश राणे यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देत विशेष सत्कार

मालवण : किल्ले राजकोट येथील महापुरुष मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली. आमदार निलेश राणे यांनी उपस्थित राहून पूजन केले.

यावेळी राजकोट मित्रमंडळ यांच्या वतीने बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी आमदार निलेश राणे यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देत विशेष सत्कार केला. यावेळी राजकोट मित्रमंडळ सदस्य, शिवभक्त उपस्थित होते.

▪️अमित खोत, मालवण