मसुरे | झुंजार पेडणेकर :ग्रामपंचायत मिर्याबांदा व ग्रामपंचायत रेवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने कोरेमहान येथील संयुक्त नळयोजनेच्या ठिकाणी दोन्ही गावातील ग्रामस्थांनी श्रमदानातून वनराई बंधारा बांधला. यावेळी पंचायत समिती सदस्या श्रीम. योजना कांबळी, रेवंडी सरपंच श्री. अमोल वस्त, उपसरपंच श्रीम. श्रद्धा वेंगुर्लेकर, मिर्याबांदा सरपंच श्रीम. नीलिमा परुळेकर, उपसरपंच श्री. लक्ष्मीकांत सावजी, ग्रामपंचायत सदस्य श्री. रोहित आडकर, ग्रामपंचायत कर्मचारी श्री. यजितकुमार परुळेकर, श्री. श्रीदत्त परब, श्री. हर्षद जाधव, रेवंडी ग्रामपंचायत सदस्य श्रीम. मेघना कांबळी, ग्रामपंचायत अधिकारी श्री. सागर देसाई,श्री. युवराज कांबळी, कृषिसेवक श्री. विवेक रंगे, लकी कांबळी, श्री. नरेश करलकर, श्री. प्रथमेश करलकर, श्री. प्रसन्न कांबळी, श्री. जयराम कांबळी, श्री. भावेश कांबळी, श्री. संदीप धुळे, श्री. सुरेश गावडे, श्री. विकास चेंदवणकर, श्री. प्रथमेश कांबळी, श्री. संजय कांबळी, श्री. मिलिंद कांबळी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.













