हिंदू जनजागृती समितीचे वेंगुर्ले तहसीलदार यांना निवेदन…
वेंगुर्ले : प्रतिनिधी
महाराष्ट्रात हिंदू भगिनींच्या रक्षणासाठी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड राज्यांच्या धर्तीवर कठोर आणि अजामीनपात्र ‘लव्ह जिहाद व अवैध धर्मातर विरोधी कायदा’ येत्या अधिवेशनात तात्काळ संमत करण्याविषयी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आज वेंगुर्ले तहसीलदार यांच्या माध्यमातून शासनास लेखी निवेदन देण्यात आले.
वेंगुर्ले येथे नायब तहसीलदार श्री. राजन गवस यांनी हे निवेदन स्वीकारले. आणि आपले निवेदन व भावना शासनापर्यंत पोहोचवतो असे सांगितले. यावेळी ॲड. सौ. सुषमा प्रभू खानोलकर नगरसेविका नगरपरिषद वेंगुर्ला, सौ. आकांशा परब नगरसेविका, सौ. इशा मोंडकर माजी नगरसेविका, सौ. साक्षी पेडणेकर माजी नगरसेविका, सौ. वृंदा गवंडळकर भाजप महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सिंधुदुर्ग, श्री. संजय गावडे जिल्हा परिषद सदस्य, आंबा व्यावसायिक श्री. अक्षय गावडे तसेच उमेद अभियान उभादांडा प्रभाग प्रतिनिधी व साधना सत्संगातील जिज्ञासू सौ. उर्वि गावडे, सौ. मानसी आंगचेकर, सनातन संस्थेचे सौ. श्रध्दा जुवलेकर, सौ. भाग्यश्री कोनाडकर, श्री. प्रविण कांदळकर, श्री. अमोल ठाकूर आदी उपस्थित होते.













